‘ते’ अनोखे जीव ! ज्यास असतात 3 हृदय, 9 मेंदू, आणि 8 पाय, जाणून घ्या जगातील अशाच काही ‘रोचक’ गोष्टी

नवी दिल्ली : जगात अशा अनेक रोचक गोष्टी आहेत, ज्या माणसाला हैराण करून टाकतात. जसे की फिलिपीन्समध्ये आढळणारी बया नामक चीमणी, तिला प्रकाशात राहण्याची एवढी आवड आहे की, ती आपल्या घरट्याला चारीकडून मातीने लिपून घेते, आणि त्यावर काजवे चिकटवते, जेणेकरून घरट्यात उजेड पडावा. आज आपण अशाच काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा म्हणाल की,, हे तर आम्हाला महितीच नव्हते!

माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, ज्याची उंची 8,848 मीटर आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का पृथ्वीवर 15,000 मीटरपेक्षा उंच पर्वत असूच शकत नाही. होय, कारण असे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते.

14 एप्रिल 1912 रोजी समुद्रात बुडालेले जगातील सर्वात मोठे वाफेवरील प्रवासी जहाज टायटॅनिकची लांबी 269 मीटर होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जर हे जहाज उभे केले असते तर ते त्याकाळातील सर्वात मोठ्या इमारतीपेक्षा उंच झाले असते. एवढेच नव्हे, त्याच्या चिमण्या इतक्या मोठ्या होत्या की, त्यामधून दोन ट्रेन आरामशीर जाऊ शकल्या असत्या.

जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांच्यानुसार, आपण रात्री आकाशात जे लाखो तारे पाहातो, प्रत्यक्षात ते त्या ठिकाणी नसतात, तर दुसरीकडे असतात. आपल्याला तर त्यांनी मागे सोडलेला अनेक लाख वर्षांपूर्वीचा प्रकाश दिसत असतो.

ऑक्टोपस एक खुपच विचित्र समुद्रप्राणी आहे, ज्यास ’डेव्हिलफिश’ सुद्धा म्हटले जाते. मानवाकडे तर एकच हृदय आणि एकच मेंदू असतो, परंतु तुम्ही हे एकूण हैराण व्हाल की, ऑक्टोपसला तीन हृदय आणि नऊ मेंदू असतात. एवढेच नव्हे, त्याला आठ पायसुद्धा असतात, ज्यामुळे त्यास अष्टबाहु देखील म्हटले जाते.

कांगारू ऑस्ट्रेलियाचा मुळे निवासी आहे आणि ते तेथील विकासाचे प्रतिक मानले जातात, कारण हे अनोखे प्राणी नेहमी पुढच्या बाजूलाच चालतात, मागे कधीच येत नाहीत. कांगारू एक असा प्राणी आहे, जो आपली पिले आपल्याच चामड्यापासून तयार झालेल्या थैलीत ठेवतो.