‘कोळसा’ प्रकल्पासाठी पोलिसांनी जंगलालाच ‘घेरलं’, तब्बल 40 हजार झाडांची ‘कत्तल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईच्या आरे जंगलातील वृक्षतोडीनंतर आता ओडिसाच्या संभळपूरमध्ये वृक्षतोडीचा प्रकार समोर आला. येथे देखील जंगलाच्या चारही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर या जंगल्यात झाडांची कत्तल सुरु झाली. एका मागोमाग एक अशा 40 हजार पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली.

कोयला प्रोजेक्ट के लिए पुलिस ने जंगल को घेरा, काटे गए 40 हजार पेड़

कुठे आणि का कापण्यात आली झाडे –

ही झाडे ओडिसाच्या संभळपूर जिल्ह्यातील तालबिरा गावातील आहेत. अडानी समूहाशी संबंधित नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनकडून 40 हजारांपेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आली.

कोयला प्रोजेक्ट के लिए पुलिस ने जंगल को घेरा, काटे गए 40 हजार पेड़

का कापण्यात येत आहेत झाडं –

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन कंपनी येथे कोळशाची खाण तयार करु इच्छित आहे. यासाठी त्यांनी 40 हजार पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाड चालवली. जंगलाच्या चारही बाजूंना पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला आहे. जेणे करुन ग्रामस्थांकडून विरोध होणार नाही.

ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवला आहे. पोलिसांकडून फौजफाटा लावण्यात आला असला तरी तालाबिरा गाव आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ वृक्षतोडीला विरोध करत आहेत. त्यांनी विरोध केल्याने पोलिसात आणि ग्रामस्थांमध्ये वाद देखील झाला परंतू ग्रामस्थांकडून विरोध सुरु आहे.

कोयला प्रोजेक्ट के लिए पुलिस ने जंगल को घेरा, काटे गए 40 हजार पेड़

एका कोळशाच्या कंपनीशी जोडली गेली आहे NLC –

NLC ने एका कंपनीबरोबर कोळशाची खाण तयार करण्यावर करार केला आहे. ओडिसामध्ये झरसुगुडा आणि संभळपूरमध्ये कोळशाची खाण तयार करणार आहे. 1.30 लाख पेक्षा जास्त झाडे कापल्याचा दावा काही स्थानिक कंपन्यांकडून करण्यात आला आहे. संभळपूरच्या प्रमुख कंडरवेटर ऑफ फॉरेस्टच्या रिपोर्टनुसार येथे 1,30,721 झाडं कापण्यात आली.

कोयला प्रोजेक्ट के लिए पुलिस ने जंगल को घेरा, काटे गए 40 हजार पेड़

ग्रामस्थांनी केला होता झाडे कापण्याचा विरोध-

जेव्हापासून झाडे कापण्यास सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून तालबिरा गावातील ग्रामस्थांनी याला विरोध केला. तालबिरा ग्राम जंगल कमेटीने जंगलाच्या सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले. तसेच सांगितले की जो कोणी कुटूंब जंगलाची रक्षा करेल त्याला तीन किलो तांदूळ देण्यात येतील.

कोयला प्रोजेक्ट के लिए पुलिस ने जंगल को घेरा, काटे गए 40 हजार पेड़

जिल्हाधिकाऱ्यांनी नाही दिले उत्तर, फोनच कट केला –

जेव्हा संभळपूरच्या जिल्हाधिकारी शुभम सक्सेना यांना फोन करुन माहिती घेण्याचा विचार केला, तेंव्हा त्यांनी फोन कट केला. अनेकदा फोन करुन देखील त्यांनी फोन उचलला नाही. वनमंत्री विक्रम केशरी अरुख यांनी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला परंतू तो ही अपयशी ठरला.

कोयला प्रोजेक्ट के लिए पुलिस ने जंगल को घेरा, काटे गए 40 हजार पेड़

तालाबिरातून काढण्यात येतो 2 कोटी टन कोळसा –

NLC तालाबिरा-2 आणि 3 कोल ब्लॉक्सवरुन वर्षभरात 2 कोटी टन कोळसा उत्पादन करतो. यात संभळपूर आणि झरसुगुडा मधील 4200 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्लॅट चालतो.

Visit : policenama.com