Coronavirus : कोरोनाचा ‘हाहाकार’ ! …. तर ऑलिम्पिकही रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रकोप आता चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेवर होणार असल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरस अटोक्यात आला नाही तर ऑलिम्पिक रद्द होऊ शकते असे बोलले जात आहे.

दर चार वर्षांनी क्रिडा जगताचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते. यंदाचा ऑलिम्पिकचा महाकुंभ मेळा टोकिओमध्ये आयोजित केला गेला आहे. परंतु जर कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर ऑलिम्पिक रद्द केली जाते.

कोरोनामुळे कोणताही देश सुटलेला नाही. त्याच बरोबर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडू दाखल होणार आहेत, चीनने देखील या स्पर्धेत समावेश घेतला आहे. त्यामुळे लवकरच कोरोना आटोक्यात आला नाही तर ऑलिम्पिक रद्द करण्याचा विचार सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमधील एका अधिकाऱ्यांने सांगितले की, सध्याच्या घडीला जगभरात करोना वायरसचा प्रसार झाला आहे. त्यामुळे जर मे महिन्यापर्यंत या कोरोना व्हायरसवर काही उपाय केला गेला नाही तर टोकिओ ऑलिम्पिक रद्द करावे लागू शकते. सध्या फारच कमी कालावधी ऑलिम्पिकसाठी उरला आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये दुसऱ्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा खेळवता येणार नाही, त्यामुळे जर कोरोनावर काही उपाय होऊ शकला नाही तर ऑलिम्पिक रद्द करण्यावाचून दुसरा पर्याय नसेल.

24 जुलैला टोकिओ ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे, ऑलिम्पिकपूर्वी टॉर्च लाइटिंगचा एक कार्यक्रम करण्यात येतो. यंदा 12 मार्चला ग्रीस येथील ऑलिम्पिया येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमाला कोणत्याही चाहत्याला प्रवेश दिला जाणार नाही. हा समारोह फक्त 100 मान्यता प्राप्त पाहुण्यांपुढे होणार आहे.