Omicron Variant | ओमिक्रॉन व्हेरिएंटवर WHO ने जारी केला इशारा, म्हटले – ‘हाय रिस्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Variant | संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे (COVID-19 new Variant) भय वाढत चालले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटला आतापर्यंचा सर्वात धोकादायक मानला जात होता. परंतु नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Variant) डेल्टापेक्षा सुद्धा जास्त संसर्गजन्य असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत सापडलेल्या डेटाच्या आधारावर WHO ने ओमिक्रॉन व्हेरिएंटला ’व्हेरी हाय रिस्क’वर ठेवले आहे. डब्ल्यूएचओ नुसार, या नवीन व्हेरिएंटच्या म्यूटेशनचे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात.

 

ओमिक्रॉन व्हेरिएंटची ओळख सर्वप्रथम दक्षिण अफ्रीकेच्या संशोधकांनी पटवली होती. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य एजन्सीद्वारे जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटवर WHO च्या वक्तव्याला एक मजबूत आणि सर्वात स्पष्ट इशारा मानले गेले आहे. तसेच, शास्त्रज्ञ या गोष्टीचा शोध घेण्यात व्यस्त आहे की हा नवीन व्हेरिएंट लोकांसाठी किती धोकादायक ठरू शकतो. (Omicron Variant)

 

काय म्हणते WHO –

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. मात्र, प्राथमिक पुरावे या गोष्टीची शक्यता वाढवतात की, या व्हेरिएंटमध्ये म्यूटेशन आहे जे इम्यून सिस्टम रिस्पॉन्सपासून वाचू शकते. एकातून दुसर्‍या व्यक्तीत हे पसरण्याची क्षमता वाढवते.

 

WHO चे म्हणणे आहे की, या म्यूटेशनच्या आधारावर म्हणता येऊ शकते की,
या कारणामुळे भविष्यात COVID-19 च्या प्रकरणांमध्ये उसळी येऊ शकते.
याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे की,
कोणत्या ठिकाणी याची प्रकरणे जास्त वाढत आहेत. एकुणच संपूर्ण जग सध्या हाय रिस्कवर आहे.

 

Web Title :- Omicron Variant | omicron covid 19 new variant coronavirus who warns very high risk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Noida Crime | पती गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, चप्पल लपवण्यास विसरला अन् पत्नीच्या तावडीत सापडला; पत्नीने केले असे काही..

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी बंपर भरती; 75 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या

Sapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने केलं लोकांना वेडं, गाण्याच्या व्हिडीओला 47 करोडहून अधिक Views

Nitesh Rane-Aditya Thackeray | नितेश राणेंनी लिहीलं आदित्य ठाकरेंना पत्र, काढले शिवसेना अन् BMC च्या नियोजनाचे वाभाडे

Shah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता ‘या’ गोष्टीवरून त्रस्त, तब्बल 19 वर्षानंतर केला खुलासा…