जम्मूमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात जवान शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा एकदा युद्ध बंदीचे उल्लंघन केले. युद्ध बंदीचे पाकिस्तान कडून पुन्हा-पुन्हा उल्लंघन केले जात आहे. आज जम्मू काश्मीर मधील पूंछ भागात पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा कुरापती काढण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने तोडीसतोड उत्तर दिले.

सीमेपार झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला. सीमेपार गोळीबार करणे हे पाकिस्तानी सैन्यासाठी नवीन नाही. पाकिस्तानी सैन्य वारंवार युद्ध बंदीचे उल्लंघन करत असते.

काही दिवसांपूर्वीच पाक व्याप्त काश्मीर मधील संघटना JKLF च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले होते कि, युद्ध बंदीचे उल्लंघन हे नेहमी पाकिस्तानी सैन्याकडूनच होत असते. त्यामुळे अनेक सैनिकांना आणि सामान्य लोकांना आपला जीव गमवावा लागतो. भारतीय सैन्याने दिलेल्या प्रतिउत्तरामुळे थोड्या वेळातच गोळीबार थांबला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like