देशी पिस्तूलासह सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशी बनावटीच्या पिस्तूलासह सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट १च्या पथकाने रास्ता पेठेतून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले.

शंकर उर्फ बाबू कैलास पंदेकर (वय २२,रा. अप्पर इंदिरानगर, व्हीआयटी महाविद्याालयाजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठ भागात एकजण पिस्तूल घेऊन थांबला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ मधील पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. त्यानंतर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने त्याला छापा घालून त्याला पकडले. पंदेकरची झडती घेतल्यावर त्याच्याकडे पिस्तुल आणि काडतुस सापडले. पंदेकर सराईत असून त्याच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात २२ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, योगेश जगताप, संजय बरकडे, बाबा चव्हाण, सचिन जाधव, गजानन सोनुने, तुषार माळवदकर आदींनी ही कारवाई केली.