पत्त्यात हरल्याच्या रागातून जोडीदाराची हत्या

परभणी | पोलीसनामा आॅनलाईन
पत्त्यात हरल्याच्या रागातून जोडीदाराचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली आहे. हत्येचा प्रकार दोन महिन्यांनी उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सय्यद फारुख, विठ्ठल गाैड, फिरोज शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’47ed4e35-cc7e-11e8-a70b-030dab9b6d2d’]
याबाबत सविस्तर माहिती, पूर्णा तालुक्यात चाैघेजण पत्ते खेळत होते. चाैघांपैकी जिंकलेल्या मित्राची इतर तीन जणांनी हत्या केली. तब्बल दोन महिन्यानंतर हा खुन उघड झाला. या खुनाचा तपास लावण्यासाठी पोलीसांनी वेगवेगळी अनेक पथके स्थापन केली होती. त्यानंतर दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तीन आरोपींना अटक केली आहे.
खून झालेल्या सिताराम यादव (वय 21 वर्ष) याचा मृतदेह पूर्णा तालुक्यातील पांगरा रोडवर असलेल्या आडगाव परिसरात आॅगस्ट महिन्यात आढळला होता. दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शी पुराव्यावरून स्पष्ट दिसत होते. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. वेगवेगळी पथकं स्थापन करुन तपासाला सुरुवात केली. तपास करताना पोलीसांना वेषांतरही करावे लागले. मात्र शेवटी पोलिसांनी खूनाचा शोध लावलाच. सितारामच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे उघड झाले. पत्ते खेळत असताना सितारामने पैसे जिंकले होते. त्याच रागातून खून झाल्याचे चाैकशीतून समोर आले आहे.
[amazon_link asins=’B07BHFT3VQ,B075K83QJK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc57fb10-cc7e-11e8-812f-b73eb607b3ba’]
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला जाळून मारण्याची धमकी, दोघांना अटक

पुणे  :  दुकानातील विज मीटर काढून नेल्याच्या रागातून दोघांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन जाळ्याची धमकी दिली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर जीवे मारणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमरास मयुरेश डायनिंग हॉल चौकातील भुसारी कॉलनीत घडला.महेश श्रीधर कांटे (वय-२९), विकास श्रीधर काटे (वय-३५ रा. वारजे माळवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर संतोष राऊत (वय-२८ रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष राऊत हे महाराष्ट्र राज्य वितरण विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी एकच्या सुमरासा ते भुसारी कॉलनीत कर्तव्य बजावत होते.आरोपींनी वीज बिल न भरल्याने राऊत यांनी त्यांच्या दुकानातील वीज मीटर काढून घेऊन जात होते. त्यावेळी आरोपींनी राऊत यांना मारहाण करुन वीज मीटर पुन्हा दुकानात बसवण्यास सांगितले. तसेच त्यांना जीवंत जाळून मारण्याची धमकी देऊन राऊत हे करित असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एन.ए. मुंढे करित आहेत.