कंपनीत चोरी करण्यास मनाई केल्याने केला खून

टाकवी (पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन

बंद असलेल्या कंपनीतील सामान चोरण्यास मनाई केल्याच्या करणावरुन कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा खून करुन मृतदेह गवतात टाकून दिला. पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली. मयताचे वारसदार मिळत नसल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, एससीबीने केलेल्या तपासात हा खून असून मयत व्यक्ती ही कंपनीत सुरक्षा रक्षक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणाचा छडा लावून दोघांना अटक करण्यात आली. ही घटना २७ सप्टेंबर रोजी मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीनेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ccc83467-cb1e-11e8-b43f-d33dc38f4978′]

गुरुजी उर्फ विरेंद्रसिंग (रा. बिहार) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तर नवनीत भीमराव पाटील (वय-४७ रा. कान्हेफाटा ता.मावळ मूळ रा.मुपो.आर्ते ता.शिरपूर जि.धुळे), अर्जुनसिंग ननसिंग सुनार वय- ४५ रा.टाकवी बु ता मावळ मूळ रा.नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी अर्जुनसिंग याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपी अर्जुनसिंग आणि मयत विरेंद्रसिंग हे दोघे अस्मा मेटल या कंपनीत एक वर्षापासून काम करत होते. तिघेही कंपनी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. कंपनी बंद पडल्याने आरोपी नवनीत पाटील व मयत विरेंद्रसिंग यांचे काम बंद झाले. कंपनी बंद झाली तरी अर्जुनसिंग कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. याचा फायदा घेऊन या तिघांनी संगमताने कंपनीमधील मशीनचे पार्ट चोरून विकले. त्यानंतर नवनीत पाटील २५ सप्टेंबर रोजी पुन्हा  कंपनीत येऊन पार्ट चोरून नेण्यासाठी कंपनीचा वॉचमन अर्जुनसिंग कडे याच्याकडे आला होता. परंतु त्यास अर्जुनसिंग व विरेंद्रसिंग सामान चोरण्यास विरोध केला. तेव्हा नवनीत पाटील याने विरेंद्रसिंगला कंपनीचे बाहेर रोडवर नेले व हाताने आणि दगडाने मारहाण केली त्या मारहाणीत विरेंद्रसिंगचा मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d540a0cb-cb1e-11e8-91a7-d782f30edf02′]

आरोपी अर्जुनसिंग याने वडगाव मावळ पोलिसांना अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद करुन मृतदेह शवविच्छेनासाठी पाठवून दिला. तसेच मृत व्यक्तीचे नातेवाईक सापडले नसल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंतीमसंस्कार केले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी अर्जुनसिंग याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान घडलेली सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आरोपींना अटक करुन वडगाव मावळ पोलीसांच्या स्वाधीन केले.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dbc79e88-cb1e-11e8-b03d-91a8d9688368′]

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे, सहायक फौजदार विजय पाटील, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक रौफ इनामदार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर क्षिरसागर, गणेश महाडीक, सचिन गायकवाड, गुरु जाधव यांच्या पथकाने केली.