‘कांद्या’मुळे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान ‘अडचणीत’, मुजफ्फरनगर न्यायालयात ‘खटला’ !

वाराणसी : वृत्तसंस्था – कांद्याचे भाव गगनाला भिडले असून उत्पादनात घट झाल्यामुळे संपूर्ण देशात कांद्याची टंचाई असल्याने भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चढत्या भावामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना थेट कोर्टात खेचले आहे.

सामाजिक कार्यकर्ता राजू नय्यर याने मुजफ्फरनगर येथील दिवाणी न्यायालयात केंद्रीय अन्न व औषधे मंत्री रामविलास पासवान यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशभरात कांद्याचा तुटवडा असून त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असून या सर्व बाबीला केंद्रीय मंत्री राम विलास पासवान आणि त्यांचे मंत्रालय जबाबदार आहे. न्यायालयाने हा खटला दाखल करुन घेतला असून त्याची सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.

चेन्नईमध्ये सध्या कांदा १२० ते १५० रुपये किलो भावाने विकला जात आहे. दिल्लीसह देशातील मोठ्या शहरांमध्ये कांद्याचे भाव १५० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

Visit : Policenama.com