सांगली महानगरपालिकेत घेतली जाणार ‘ऑनलाईन’ महासभा

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनच्या काळात अनेकठिकाणचे कामकाज ठप्प पडले आहे. त्यात महापालिका देखील अपवाद नाही. अशा परिस्थितीत कोरोनावर उपाययोजना करण्याच्या बैठकीसाठी सांगली महानगरपालिका हि चक्क झूम अँप द्वारे ऑनलाईन सभा घेणार आहे. महाराष्ट्रात सांगली हि ऑनलाईन पद्धतीने सभा घेणारी पहिलीच महानगरपालिका ठरली.

कोरोनामुळे गेली २ महिने महापालिकेची सभा झाली नाही. महापालिकेचा अर्थसंकल्पही कोरोना संक्रमणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत रखडला आहे . त्यामुळेच सांगलीच्या महापौर गीता सुतार आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सहमतीने सांगली मध्ये ४ में रोजी ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यात येणार आहे. या सभेला सांगली महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक, अधिकारी हे झूम अँप द्वारे महासभेत सहभागी होणार आहेत.