#Loksabha : उस्मानाबादमध्ये गायकवाड आणि निंबाळकरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने आघाडी घेतली असताना सेना-भाजप सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र राजकीय पटलावर बघायला मिळते आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात स्थानिक शिवसैनिकांनी खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. तर गतवेळी प्रमाणे या हि वेळी ओमराजे निंबाळकर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

शिवसेनेने अद्याप उस्मानाबादच्या उमेदवाराबद्दल निर्णय घेतला नाही. तर रवी गायकवाड आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये तिकिटासाठी चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. रवींद्र गायकवाड मतदारसंघात फिरकत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये म्हणून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे रवींद्र गायकवाड याची तक्रार केली आहे.

दरम्यान, उस्मानाबादची उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भात आज शुक्रवारी मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. तर रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी देऊच नये यासाठी त्यांच्या विरोधात असणाऱ्या शिवसैनिकांनी मुंबईतच तळ ठोकला आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आज अथवा उद्या शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते.

ह्याहि बातम्या वाचा –

कोर्टात न्यायाधीशांना शिव्या देणारा उद्योजक गजाआड

‘पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार’ : भाजप महिला नेता बरळली

Loksabha 2019 : शिवसेनेच्या ‘त्या’ जागेसाठी भाजपची ‘फिल्डींग’ कोणत्या जागेसाठी हे वाचा सविस्तर

राष्ट्रवादीची दुसरी यादी लांबण्याची शक्यता