31 वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2020 चं उद्घाटन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस दल, उस्मानाबाद यांच्या वतीने 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य सुरक्षा अभियान- 2020 चे उद्धघाटन जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाज वाहतूक मंत्रालय सल्लागार समिती सदस्य ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आ. कैलास पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपविभागीय अधिकारी राजेश्वर रोडगे, कार्यकारी अभियंता सा. बा. अनिल सगर, सिविल सर्जन राज गलांडे तसेच संबधित विभागाचे अधिकारी कर्मचारी, शालेय विधार्थी आदी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/