‘हे’ 7 संकेत सांगतात की तुमचे हाडे होताहेत कमजोर, निष्काळजीपणा पडू शकतो महागात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : हाडे शरीराची रचना राखण्याबरोबरच स्नायूंना योग्य ठेवण्याचे काम करत असतात आणि बर्‍याच अवयवांचे रक्षण देखील करतात. म्हणून हाडांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कालांतराने, हाडांची शक्ती ही कमी होऊ लागते. 30 वर्षांनंतर बहुतेक लोकांच्या हाडांची घनता कमी होते आणि हाडे कमकुवत होतात. हाडे कमकुवत झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतो आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. दरम्यान काही संकेत अशी आहेत जी तुम्हाला सूचित करतात की तुमची हाडे कमजोर होत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये.

हिरड्यांचा अशक्तपणा

हाडे कमकुवत झाल्यामुळे हिरड्यांना त्रास होऊ लागतो. जबड्याचे हाड दातांवर ताबा ठेवते आणि एका वयानंतर ते इतर हाडांप्रमाणे कमकुवत होते. जबड्याचे हाड तुटल्यामुळे हिरड्यांमधून दात बाहेर येऊ लागतात किंवा ते वेगळे होऊ शकतात. जबडा कमकुवत झाल्यामुळे दात खराब देखील होऊ शकतात.

पकड कमकुवत होणे

बर्‍याच अभ्यासांमध्ये हातांची पकड आणि मनगट, मणक्याच्या आणि हिपच्या हाडांच्या घनतेत एक संबंध आढळला आहे. पोस्टमेनोपॉझल महिलांवरील नुकत्याच केलेल्या अभ्यासात संपूर्ण शरीरातील हाडांची घनता जाणून घेण्यासाठी हातांची पकड मजबूत असणे ही सर्वात महत्त्वाची शारीरिक चाचणी मानली जाते.

कमकुवत आणि तुटणारी नखे

जर आपले नखे वारंवार तुटत असतील तर ते आपल्या शरीरात कॅल्शियम आणि कोलेजनच्या कमतरतेमुळे असू शकते. हे दोन्ही पोषक द्रव्ये मजबूत हाडांसाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. कमकुवत नखांकडे सुरुवातीचे संकेत म्हणून पाहिले जाऊ शकते जे सांगतात की आपल्या शरीराला आणि हाडांना या महत्वाच्या पोषक द्रव्यांची खूप जास्त गरज आहे.

उबळ, स्नायू आणि हाडांमध्ये वेदना

हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. यांच्या अभावामुळे शरीरात उबळ, स्नायू आणि हाडे दुखू शकतात. जर शरीरात या जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांची सतत कमतरता राहिली तर यामुळे हाडांचे नुकसान होऊ शकते.

शरीराचे झुकणे

हाडांच्या फ्रॅक्चरमुळे शरीर पुढे झुकू लागते. अशक्त हाडांचे हे प्रारंभिक लक्षण असू शकते. जास्त वजन न घेता जर आपल्या मणक्याचे हाड वाकलेले असेल किंवा खराब पद्धतीने बसल्याच्या कारणामुळे मणक्याच्या सभोवतालचे स्नायू कमकुवत होत असतील, तर शक्य आहे की तुमची हाडे कमजोर होऊ लागली असतील.

फिटनेस मध्ये कमी

जर तुमचा फिटनेस कमी होत असेल तर कदाचित तुमच्या हाडांची घनता कमी होत असेल. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वजन कमी करण्याच्या व्यायामामुळे हाडांचे नुकसान कमी होते आणि ते कॅल्शियम आणि हाडे तयार करणाऱ्या पेशींद्वारे मजबूत हाड तयार करतात.

हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे

सरासरी हृदय गती दर प्रति मिनिट 60 ते 100 बीट्स दरम्यान आहे, परंतु तज्ञ म्हणतात की प्रति मिनिट 80 बीट्सपेक्षा जास्त पल्स रेट असले तर हिप, पेल्विस आणि मणक्याचा फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. हृदयाची गती ही आपल्या फिटनेसची पातळी दर्शवते.