Coronavirus : जून-जुलै पर्यंत ‘महामारी’ शिगेला पोहचणार, केली लॉकडाऊनची घोषणा, हंगेरीच्या पंतप्रधानांनी सांगितलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – हंगेरीच्या पंतप्रधानांनी देशात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधान विक्टर ओर्बन यांनी शुक्रवारी याची माहिती देताना म्हटले कि ही महामारी जून किंवा जुलैपर्यंत देशात ही साथीची पातळी शिगेला पोहोचण्याची अपेक्षा आहे.

देशात शनिवारपासून सुरु होणाऱ्या बंद दरम्यान नागरिकांना खरेदी करण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी मर्यादित परवानगी असेल, पण लोकांना एकमेकांपासून अंतर ठेवावे लागेल आणि असे न केल्यास पोलिसांकडून बंदी घातली जाईल. पोलिसांकडे लोकांवर मोठा दंड लावण्याची शक्ती असेल. ते म्हणाले की, सरकार एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थव्यवस्थेसाठी एक आऊटब्रेक ऍक्शन प्लनही सादर करेल. हंगेरीमध्ये या व्हायरसची ३०० प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि १० लोकांचा मृत्यू झाला आहे. ओबर्न म्हणाले कि प्रकरणांची वास्तविक संख्या कदाचित जास्त आहे.

ग्रीसमध्ये मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागात लॉकडाऊन
ग्रीसच्या अनेक शहरामध्ये मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागात लॉकडाऊन केले गेले आहे. हे पाऊल या भागात कोरोना व्हायरसची काही नवीन प्रकरणे आढळल्यामुळे आणि एक मृत्यूनंतर उचलले गेले आहे.

इराणमधील शहरांमधील हालचालींवर निर्बंध
कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना इराणने शहरांमध्ये हालचालींवरही निर्बंध आणले आहेत. याशिवाय सगळ्या शासकीय आणि अशासकीय कार्यक्रमांवर बंदी घातली असून अनेक कडक पावले उचलण्याची घोषणा केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले कि देशात आणखी १५७ लोकांचा मृत्यू झाला असून २,३८९ प्रकरणे आढळली आहेत.

व्हिएतनाम मध्ये परदेशातून आलेली हजारो लोकं क्वारंटाइन कॅम्पमध्ये
व्हिएतनामने युरोप आणि अमेरिकेतून परत आलेल्या हजारो नागरिकांना लष्करी क्वारंटाइन कॅम्पमध्ये ठेवले आहे. अशा कॅम्पमध्ये ठेवलेल्या लोकांची संख्या सुमारे ४५ हजार असल्याचे सांगितले जाते आहे. व्हिएतनाममध्ये इतर शेजारच्या देशांच्या तुलनेत कमी लोक संक्रमित आहेत.