1,500 रुपयात पूर्ण होईल ‘जीवन’ आणि ‘आरोग्य’ विम्याची गरज, जाणून घ्या ‘ऑफर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीच्या संकटाचे सावट अजूनही कायम आहे. यादरम्यान देशातील एक सर्वात मोठे हेल्थकेयर नेटवर्क्स रुपे कार्ड होल्डर्स आणि युपीआय यूजर्ससाठी एक खास युनिव्हर्सल कव्हर घेऊन आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे सर्वबाबतीत आत्मनिर्भर भारतासाठी उचललेले पाऊल आहे.

काय आहे ही युनिव्हर्सल स्कीम?
ऑक्सी हेल्थ केयरने सांगितले, आत्मनिर्भर भारताकडे टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे. यामध्ये झिरो परदेशी फंडिंग होईल. देशातील लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत लाईफ इन्श्युरन्स, हेल्थ इन्श्युरन्स आणि अन्य हेल्थकेयर गरजांसाठी विना व्याजाच्या ईएमआयवर ऑफर करत आहोत. याची किंमत 1,500 रुपये प्रति महीना असेल.

या लोकांना मिळेल लाभ
कंपनीने सांगितले की, याचा लाभ केवळ त्याच लोकांना मिळू शकेल जे रूपे कार्ड किंवा युपीआय युजर आहेत. कंपनीने म्हटले की, सध्याच्या स्थितीत सर्वांना आपले कुटुंब आणि स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची सर्वात जास्त गरज आहे. संकटाच्या या काळात लोकांच्या जवळ कॅशची सुद्धा कमतरता आहे. अशावेळी त्यांच्यासाठी यातून थोडी मदत मिळू शकते. देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यादरम्यान लॉकडाऊनमुळे अनेक राज्यात लोकांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी ऑक्सी हेल्थ केयर लोकांना दिलासा देऊ शकते.रूपे आणि युपीआय नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रॉडक्ट आहे. युपीआयच्या मदतीने युजर्स कोणत्याही बँकेतून तोबडतोब पैसे ट्रान्सफर करू शकतात.