तुरूंगातून सुटताच चिदंबरम आले ‘अ‍ॅक्शन’मध्ये, कांद्याच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कालच माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांना 106 दिवसांनी जामीन मिळाला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच चिदंबरम तात्काळ सक्रिय झाले. अधिवेशनासाठी संसदेत हजेरी लावलेल्या चिदंमबरम यांनी पहिल्याच दिवशी सरकारला कांद्याच्या मुद्द्यावर घेरले. चिदंमबरम यांनी सरकारला घेरत आरोप केली की आर्थिक आघाडीवर सरकार सपशेल फेल ठरले आहे.

देशभरातील कांद्याचे दर गगनाला भिडले आहे. सामान्याच्या ताटातून कांदा गायब झाला आहे. याच काँग्रेसने संसद भवन परिसरात सरकार विरोधात नारेबाजी करत आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात फलक देखील झळकवण्यात आले. या फलकांवर महंगाई की प्याज पर मार, चूप क्यूँ है मोदी सरकार असे लिहण्यात आले होते. यावेळी जोरदार घोषणबाजी करण्यात आली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्या म्हणाल्या की माझ्या घरात जास्त कांदा खात नाही. त्यामुळे मला दरवाढीची चिंता नाही. त्यानंतर वादाला तोंड फुटले आणि सोशल मिडियावर सामान्यांनी टार्गेट केल्यानंतर आता भाजपची चिंता वाढली आहे. यावर चिदंमबरम यांनी टीका करताना म्हणले की लोकांना कांदे आणि लसून कमी खाण्याचा सल्ला देणाऱ्या सरकारने चालतं व्हावं.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन मंजूर केला. आयएनएक्स मीडिया या कथित आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात चिंदमबरम हे मागील तीन महिन्यांहून आधिक काळ तुरुंगात होते. आड त्यांनी सुटून आल्यावर राज्यसभेत हजेरी लावली.