Ayodhya Ki Katha : पहलाज निहलानींची मोठी घोषणा, म्हणाले – ‘अयोध्या आणि राम मंदिरवर बनवणार फिल्म’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नुकतेच उत्तर प्रदेशच्या अयोध्येत श्रीराम मंदिर भूमीपूजनचा भव्यदिव्य कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलान्यास केला होता. यानंतर लोक अतिशय उत्साही आहेत आणि मंदिरात पूजेसाठी जाण्याचा योग कधी येतोय, या प्रतिक्षेत आहेत. परंतु, आता बॉलीवुड इंडस्ट्रीतून याबाबत एक मोठी बातमी येत आहे आणि ती आहे, अयोध्या आणि रामावर एक नव्हे, तर दोन चित्रपट बनवण्याची घोषणा झाली आहे.

बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतने याबाबत घोषणा केली होती की, ती अयोध्या आणि रामावर एक चित्रपट बनवणार आहे, परंतु आता सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी सुद्धा एक अशीच घोषणा केली आहे. पहलाज निहलानी यांनी चित्रपटाची घोषणा करताना तो दिवाळी 2021 मध्ये रिलीज करणार असल्याचे म्हटले आहे. पहलाज निहलानी यांच्या चित्रपटाची पुढील वर्षी दिवाळीत सुपरस्टार अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधनसोबत टक्कर होईल.

पहलाज निहलानी

पहलाज निहलानी यांच्या चित्रपटाची शुटिंग या वर्षी दिवाळीनंतर सुरू होऊ शकते. या चित्रपटाचे नाव अयोध्या की कथा असेल.

कंगना राणावत

अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या चित्रपटाचे नाव अपराजिता अयोध्या ठेवले आहे आणि यावरून खुप चर्चा सुरू आहे.

बाहुबलीचे लेखक

कंगना राणावतच्या चित्रपटाची कथा बाहुबलीचे लेखक के वी विजयेंद्र प्रसाद लिहिणार आहेत, जे राम मंदिराचा पूर्ण इतिहास लिहितील.

बाबरी मशिद

याशिवाय असेही समजते की, या चित्रपटात बाबरी मशिद आणि ती बनवण्यापासूनचा सर्व इतिहास सुद्धा असणार आहे.

फॅन्सला प्रतिक्षा

पहलाज निहलानी यांच्या चित्रपटाबाबत लोक खुश आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, ते हा मोठा इतिहास जाणून घेण्यासाठी खुप उत्सुक आहेत.