‘टेरर फंडिंग’ साठी पाकिस्तान उच्चायुक्तद्वारे पाठवतय भारतात बनावट नोटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोटबंदीनंतर आता तीन वर्षांनी पाकिस्तान नकली नोटांद्वारे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात नकली नोटा भारतात आणल्या जात असून याद्वारे भारताची अर्थव्यवस्था ढासळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. 2016 पूर्वी ज्याप्रमाने विविध मार्गांद्वारे नकली नोटा भारतात पाठवल्या जात असतं त्याचप्रमाणे आतादेखील या नोटा भारतात पाठवल्या जात आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आले असून पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे नोटा छापून जास्तीत जास्त संख्येने नकली नोटा भारतात पाठवल्या जात आहेत. भारतातील चलनी नोटांची हुबेहूब नक्कल करून दहशतवादी संघटना  जैश-ए-मोहम्मद आणि  लश्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांना या नोटा पुरवल्या जात आहेत. पाकिस्तानातून आलेल्या 2 हजार रुपयांच्या नकली नोटा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधून येणाऱ्या या नकली नोटांमध्ये खऱ्या नोटांप्रमाणेच असणाऱ्या सुरक्षा बाबींचा वापर करण्यात येत आहे. यासाठी हुबेहूब नोटा छापण्यात येत असून यामुळे ती नकली आहे कि असली हे समजणे कठीण जाणार आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, काराचीमधील  ‘मलीर-हाल्ट’ परिसरातील पाकिस्तानी सिक्योरिटी प्रेसमध्ये या नोटा छापल्या जात असून यासाठी ‘ऑप्टिकल वेरिअबल इंकचा वापर करण्यात आला आहे. या इंकची खासियत म्हणजे नोटेवर हि शाई हिरव्या रंगाची दिसून येते.

त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधून येणाऱ्या नकली नोटांमध्ये या प्रकारच्या शाईचा वापर करण्यात येत नव्हता. या शाईचे उत्पादन एक विदेशी कंपनी करत असून मोजक्याच देशांना हि शाई उपलब्ध करून दिली जाते. कराचीमधील प्रेसमध्ये या नोटा छापल्यानंतर दाऊदच्या व्यक्तींकडे या नकली नोटा भारतात पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे कि, या नकली नोटांची हुबेहूब नक्कल करण्यात आली असून अनेकांनी या नोटा ओळखणे अवघड जात आहे.

या नोटा भारतात पोहोचवण्यासाठी पाकिस्तान विविध मार्गांचा अवलंब करत असून खलिस्तानचा समर्थक असलेल्या  खालिस्तान जिंदाबाद फोर्सच्या व्यक्तिजवळून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. तसेच या ग्रुपकडून 5 एके-47 रायफल्स, 30 बोर पिस्टल, 9 हँड ग्रेनेड, 5 सॅटलाइट फोन, 2 मोबाइल  फोन देखील जप्त केले होते. 25 सप्टेंबर रोजी ढाका पोलिसांनी देखील नकली नोटा असणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती. दुबईमध्ये राहणाऱ्या सलमान शेरा याने हे पार्सल बांग्लादेशमध्ये पाठवले होते.

Visit : Policenama.com