PAK मधील कुख्यात आतंकवादी उमर शेखची होऊ शकते सुटका, पत्रकार ‘डेनिअल पर्ल मर्डर’ अन् ‘कंधार’ प्रकरणात होता समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १९९४ साली भारतात चार परदेशी नागरिकांचे अपहरण करत काश्मीर मुद्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारा आणि पत्रकार डेनियल पर्लचा हत्यारा उमर सईद शेख परत एकदा सुटका होणार आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या उमर शेखला पहिले तेथील दहशतरोधी न्यायालयाने मृत्युदंड सुनावला होता. यानंतर एका स्थानिक न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा दिली होती. गुरुवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या उच्च न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा कमी करून सात वर्षाची शिक्षा दिली आहे. याचा अर्थ मागच्या १८ वर्षांपासून पाकिस्तानच्या एका सुरक्षित तुरुंगात असलेल्या उमर शेखची सुटका होऊ शकते. पाकिस्तान सरकार या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते.

सिंध न्यालयाच्या निर्णयाने स्पष्ट केले आहे की, शेजारील देशात दहशतवादी संघटना आणि कुख्यात दहशतवाद्यांना शिक्षा देण्याला गंभीरतेने घेतले जात नाही. काही महिने अगोदर भारतात काही दहशतवादी कारवायांना अंजाम देणाऱ्या हाफिज सईदला देखील मुक्त केले गेले आहे. हाफिज सईदचा सहकारी आणि मुंबई हल्ल्यात मुख्य असलेला जकी उर रहमान लखवीची अगोदरच सुटका झाली आहे. आता पाहावे लागेल की, पाकिस्तान सरकार सिंध हाय कोर्टाच्या निर्णया विरुद्ध उच्च न्यायालयात अपील करते कि नाही.

उमर शेखला जगभरात भलेही डेनियल पर्लचा हत्यारा समजले जाते पण याचे भारतीय कनेक्शन याहून जुने आहे. १९९९ सालच्या शेवटी दहशतवाद्यांनी सरकारी विमान कंपनी इंडियन एअरलाइन्स आयसी ८१४ ला अपह्रत केले होते. विमानात आपल्या नागरिकांना सोडवण्यासाठी तत्कालीन एनडीए सरकारने तीन कुख्यात दहशतवादी मौलाना अजहर, मुश्ताक अहमद जरगर यासह ओसामा शेखला सोडले गेले होते. तेव्हा ओसामा उत्तर प्रदेशाच्या गाझियाबाद मधील तुरुंगात भारतातील चार परदेशी नागरिकांना अपहरण केल्याप्रकरणी शिक्षा भोगत होता.

खरतर ओसामा शेख आणि मसूद अजहर पाकिस्तानच्या गुप्त संघटन आयएसआयकडून भारतात दहशतवादी कारवायांना वाढवण्याच्या योजनेसाठी पाठवले गेले होते. परदेशी नागरिकांचे अपहरण हा या योजनेचा भाग होता जेणेकरून काश्मीरच्या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणले जाईल. नंतर सीएसआयकडून अटक केलेल्या दहशतवादी डेव्हिड कोलमॅन हेडलीने भारतीय एजन्सीच्या सक्षम ओसामा शेखबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला की, कशा प्रकारे तो पाकिस्तानचे सैन्य आणि गुप्त संघटनेच्या मोठ्या अधिकाऱ्यांपासून अल-कायदा सारख्या मोठ्या लोकांशी आणि त्यांच्या भारतीय एजंटमध्ये एक पूल म्हणून काम करत होता.