Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांवर जीव तोडून उपचार करत होता ‘हा’ तरूण डॉक्टर, लढता-लढता स्वतः जीवनाशी ‘हारला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. पाकिस्तानात देखील कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तेथील डॉक्टर देखील आपल्या जीवाची परवा न करता रुग्णांंवर उपचार करण्यात गुंतले आहेत. परंतु या दरम्यान पाकिस्तानमधील एका तरुण डॉक्टरांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.

या डॉक्टराचे नाव आहे उसामा रियाज. या तरुण डॉक्टराचे वय 26 वर्ष होते. सांगितले जात आहे की रुग्णांचा उपचार करताना या डॉक्टरकडे ना की मास्क होते नाही की ग्लव्स. अशात देखील स्वत:च्या जीवाची परवा न करता या तरुण डॉक्टराकडे अनेक लोकांवर उपचार केले.

एका वृत्तानुसार उसामा रियाज आता पाकिस्तानात एक हीरो म्हणून ओळखला जात आहे. रियाज कोरोना पॉझिटिव्ह आल्याने दोन दिवसांनंतर त्याची तब्येत अधिक बिघडली. त्यानंतर त्याला जिल्हा मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले परंतु रविवारी कोरोनाने त्याचा बळी गेला.

जीबीच्या सूचना विभागाने मृत्यूची माहिती देताना सांगितले की, डॉक्टर रियाजने कोरोनाच्या विरोधी लढताना आपले बलिदान दिले, ते म्हणाले की रियाजला राष्ट्रीय नायक म्हणजेच एक हीरो म्हणून घोषित केले जाईल.

उसामा रियाज याच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सरकारकडे मास्क उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. रिजायच्या टीममध्ये 10 डॉक्टर होते. जे लोक इराणहून आले होते ते त्यांच्यावर उपचार करत होते, त्यांच्याकडे ना की आवश्यक मास्क होते ना की ग्लव्स, यामुळे एका संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने डॉ. रियाज यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मित्रांच्या मते रियाज स्वत:ची परवा न करता रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत होता.