अणुबॉम्बच्या धमकीला कोणीही भिक घातली नाही ! आता तोंड पाडून पाकिस्तान आलं ‘टेबल’वर चर्चा करायला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला युद्धाची पोकळ धमकी देणारा पाकिस्तान अखेर नरमला असून जगभरात सगळीकडे हातपाय पसरून झाल्यानंतर अखेर पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चेसाठी तयार झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे कि, काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला कोणतीही अडचण नाही.

या मुद्यावर बोलताना शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलं कि, पाकिस्तानने या चर्चेसाठी नकार दिलेला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी देत म्हटले होते कि, जोपर्यंत भारत सरकार काश्मीरच्या कलम 370 वर पुनर्विचार करत नाही तोपर्यंत भारताशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. त्याच दरम्यान परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे कि, जर कुणी तिसऱ्या राष्ट्राने यामध्ये मध्यस्थी केली तर आम्हाला आनंदच होईल. मात्र सध्या भारताकडून कोणत्याही चर्चेचे वातावरण दिसत नाही.

त्याचबरोबर या प्रकरणात सध्या तीन पक्षकार असून काश्मीर, भारत आणि पाकिस्तान हे तीन पक्षकार आहेत. त्याचबरोबर काश्मीरमध्ये बंद करण्यात आलेल्या सर्व काश्मिरी नेत्यांना देखील सोडावे लागेल तरच पाकिस्तान भारताबरोबर या विषयावर चर्चा करेल. त्यामुळे शाह महमूद कुरेशी यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानच्या बदलत्या परराष्ट्रीय धोरणाचा भाग म्हणता येईल. याआधी मात्र पाकिस्तान केवळ अणुयुद्धाचीच धमकी देत होता. काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानने खूप प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेक मोठ्या राष्ट्रांसमोर हात पसरले मात्र त्यांना कुणीही मदत केली नाही. यामुळे पाकिस्तानला या प्रश्नावर एक पाऊल मागे यावे लागले असून अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांनी देखील या प्रकरणात भारताला साथ दिली आहे.

दरम्यान, याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील भारताला या मुद्द्यावर चर्चेसाठी आमंत्रण दिले होते. मात्र त्यामध्ये त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या. यामध्ये त्यांनी कलम 370 संदर्भातील निर्णय मागे घेण्याची महत्वाची अट ठेवली होती. त्यामुळे आता भारताकडून या मुद्द्यावर काय उत्तर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –