काश्मीरमध्ये PAK कडून गोळीबार, भारतीय लष्करानं दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३ पाकिस्तानी ठार

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – अलिकडील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. आज (गुरूवार) पाकिस्तानने पूँछमधील केजी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र, पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील ठासून उत्तर दिले आहे. पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे.

https://twitter.com/ANI/status/1161956000292835329/photo/1

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेत कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. जगभर मदतीची मागणी करत असलेल्या पाकिस्तानला कोणत्याही देशाने भिक घातली नाही. अमेरिका असो वा चीन त्यास कोणी देखील मदत केलेलली नाही. त्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ झाला आहे. अनेकदा पाकिस्तानी सैनिकांकडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय जवानांनी वेळावेळी घुसखोरीचा प्रयत्न करणाèया पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज पुन्हा पाकिस्तानी सैनिकांकडून पूँछ जिल्हयातील केजी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे.

पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यावेळी भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुप्तचर यंत्रणांतील सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ असून तो दहशतवादी हिंसाचार घडवून आणण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या भारतीय सैनिकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आरोप – प्रत्यारोप
शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सैनिकांनी धडा शिकवला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या लष्कराने ५ भारतीय सैनिक शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असताना मारण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यास भारतीय लष्कराने स्पष्टपणे नाकारलं आहे. तसं काहीच झालं नसल्याचं भारतीय लष्कराच म्हणणं आहे. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात ३ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. उरी आणि राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –