बालाकोट पार्ट 2 ? संपुर्ण रात्र दहशतीत झोपलं कराची शहर, ट्विटरवर दिसली पाकिस्तानची भीती (व्हिडीओ)

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मंगळवारी रात्रीपासून पाकिस्तानच्या कराची जवळच्या सीमेवर काही हालचाली सुरू आहेत. आकाशात येणाऱ्या लढाऊ विमानांचा आवाज आणि सतत फिरत असणाऱ्या विमानांमुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी कराची हे ट्विटरवर अव्वल ट्रेंडवर राहिले आणि पाकिस्तानचे लोक ट्विट करत आहेत की भारताने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी काहीतरी मोठे केले.

पाकिस्तानच्या अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी असा दावा केला होता की कराचीमध्ये मंगळवारी रात्री पूर्णपणे अंधार पडला आणि केवळ लढाऊ विमान आकाशात फिरत होते. लोकांनी लिहिले की आम्हाला रात्री असे वाटले की पुन्हा एकदा भारताने बालाकोट एअरस्ट्राइकसारखे काहीतरी केले आहे.

कराचीचा रहिवासी असल्याचा दावा करणाऱ्या एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की मी विमानतळावर जेट विमाने पाहिली होती, मला असे वाटते की कराचीवरून बरेचसे लढाऊ विमान उडत आहेत.

याशिवाय पाकिस्तानी पत्रकार वज खान यांनीही ट्विट करुन असे लिहिले आहे की, भारत आणि पाकिस्तानने काय घडत आहे ते स्पष्ट केले पाहिजे. कारण कराची शहरात बर्‍याच अफवा पसरत आहेत ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

https://twitter.com/SacchiSadhana/status/1270477649639469058

इतकेच नाही तर काहींनी व्हिडिओ देखील ट्वीट केला, तथापि याची पुष्टी करणे तसे अवघड आहे. विशेष म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता आणि दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तेव्हा मध्यरात्री पाकिस्तान हवाई दलाला काहीही करता आले नाही. जेव्हा पाकिस्तानच्या लोकांनी अशी ट्वीट केली तेव्हा भारताच्या ट्विटर वापरकर्त्यांनीही खूप आनंद लुटला. आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला एअरस्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली.

https://twitter.com/Atheist_Krishna/status/1270568017030594560

विशेष म्हणजे पाकिस्तानमधील हवाई दल गेल्या काही दिवसांपासून कराचीजवळ सराव करत आहे. ज्यामध्ये मोठी लढाऊ विमानं उडवली जात आहेत.