PAK मध्ये मौलानाची वायफळ बडबड, म्हणाला – ‘कोरोना म्हणजे एक कट, वॅक्सीन बनवून चीप घालतायेत, मुस्लीमांचा स्वभाव कंट्रोल करणार’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानही जगात कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून उदयास आले आहे. येथे आतापर्यंत 85,000 पेक्षा जास्त संसर्गाची नोंद झाली आहे, तर जवळपास 1800 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी मौलाना कौकाब नूरानीने कोरोना विषाणूला मुस्लिमांविरूद्ध कट असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर नूरानीचे एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये तो हा व्हायरस यहुद्यांचा कट असल्याचे सांगत आहे आणि लोकांना उपचारासाठी रूग्णालयात न जाण्याचे आवाहनही करीत आहे.

या व्हिडिओमध्ये मौलाना कौकाब नूरानी सांगत आहे की, कोरोना विषाणू यहुद्यांनी तयार केला आहे आणि आता ते लस तयार करीत आहेत. कौकबने याला केवळ मुस्लिमांविरूद्धचे षडयंत्रच म्हटले नाही तर कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर आपल्या समर्थकांना उपचारासाठी रुग्णालयात न जाण्याचे आवाहनही केले. त्याने म्हंटले कि, कोरोना हा यहुद्यांचा कट आहे आणि ते लस बनवून त्यात एक चिप टाकत आहेत.

लस मुसलमानांवर नियंत्रण ठेवेल
मौलानाने पुढे म्हंटले की, जेव्हा यहुद्यांनी तयार केलेली ही लस मुस्लिम किंवा कोणत्याही मानवाच्या शरीरात जाईल, तेव्हा ती चिपही आत जाईल. या चिपद्वारे मुस्लिमांची मनःस्थिती नियंत्रित केली जाईल. आपण काय करणार आहात आणि आपण काय विचार करीत आहात, हे सर्व यहूदी लोकांना आधीच कळेल. नूरानी एवढ्यावरच थांबले नाहीत, पुढे म्हंटले की, रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना रुग्णांना मारण्यासाठी पैसे दिले जातात.

लोकांनी रुग्णालयात जाऊ नये
मौलानाने लोकांना सांगितले की, तुम्हाला संसर्ग झाला तरी रूग्णालयात जाऊ नका, तिथे गेल्यावर तुम्ही परत येऊ शकणार नाही. तेथे व्हेंटिलेटरवर चढून डॉक्टर तुम्हाला मारून टाकतील, हे लोक कुटुंबास भेटू देत नाहीत कारण यामुळे त्यांचे काळे सत्य जगासमोर येईल. कौकब नूरानी यांच्या म्हणण्यानुसार यहुदी लोकांना कोरोना संक्रमणाद्वारे जगावर नियंत्रण ठेवायचे आहे. यहूदी लवकरच एक चलन आणतील ज्याद्वारे हे लोक संपूर्ण जग ताब्यात घेतील.