पुलवामा सारख्या घटना घडणार, पाक PM इम्रान खानची ‘तथाकथित’ धमकी ; अमेरिकेकडून ‘LoC’वर शांततेच ‘आवाहन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची सवय काहीकेल्या जात नाहीये. आत यावेळीदेखील पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी संसदेच्या संयुक्त सत्रात भारताविरोधात गरळ ओकली आहे. इम्रान यांनी पोकळ धमकी देत ‘जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यामुळे भारतात आता पुलवामा सारख्या घटना होतील’ असे म्हटले आहे. त्याबरोबरच हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करुण भाजप च्या वर्णद्वेषी विचारधारेमुळे भारतात अल्पसंख्यांकांवर होणार अन्याय देखील मांडणार आल्याचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

निर्णयाविरोधात हरतऱ्हेने काम करणार
जम्मू काश्मीरच्या समस्येसाठी इम्रान यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाला (RSS) जबाबदार धरले असून भारतातील सध्याच्या परिस्थितीत सर्व नागरिकांना सामान अधिकार नसून अल्पसंख्यांकांचे दमन केले जात आहे. यासंदर्भात त्यांनी मोहम्‍मद अली जिना यांचे नाव घेत ‘अविभाजित भारतात बहुसंख्‍यक हिंदू भारतीय मुस्लिमांना बंदी बनवतील असा इशारा त्यांनी आधीच दिल्याचे सांगितले.’ भारताने घेतलेला निर्णय एकतर्फी आणि बेकायदेशीर असून याला शक्य असणाऱ्या प्रत्येक प्रकारे विरोध करणार असल्याचे सांगितले.

अमेरिकेने केले शांततेचे आवाहन
संयुक्‍त राष्‍ट्र (United nations) आणि अमेरिका (United States) यांनी जम्‍मू-कश्‍मीर मधून कलम ३७० हटवाण्याच्या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तानला शांतता राखण्याचे आवाहन केले असून आपण या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टगस यांनी आम्ही दोन्ही पक्षांशी बोलून शांतता राखण्याचे आवाहन केल्याचे म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त