जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद, अखनूर सेक्टरमध्ये 2 जवान जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान आपल्या नापाक हरकतींपासून मागे हटत नसून जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतच एक जवान शाहिद झाला आहे. त्याचबरोबर अखनूर सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानच्या गोळीबारात दोन सैनिक जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी ते साडेसात वाजेपर्यंत नौशेरा सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबारात शाहीद झालेल्या जवानाचे नाव सुभाष थापा असून तो 25 वर्षांचा होता. गोळी लागल्यानंतर या सैनिकाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.

भारताने उठवला युध्दविरामाचा मुद्दा
भारताने पाकिस्तानच्या वतीने करण्यात येत असलेल्या युध्दविरामाच्या संधीच्या उल्लंघनाबाबत अनेक वेळा पाकिस्तानसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात कलम 370 हलवल्यानंतर पाकिस्तानकडून या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. त्यामुळे भारताच्या वतीने वारंवार हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

ऑगस्टमध्ये 307 तर सप्टेंबरमध्ये 292 प्रकरणे
आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात पुंछ जिल्हात झालेल्या गोळीबारातून एका शालेय विद्यार्थिनीला वाचवण्यात यश आले होते. तसेच जुलै महिन्यात युध्दविरामाच्या संधीच्या उल्लंघनाच्या 296 तर ऑगस्टमध्ये 307 तर सप्टेंबरमध्ये 292 प्रकरणे समोर आली आहेत.

दरम्यान, मागील वर्षी जुलै महिन्यात युध्दविरामाच्या संधीच्या उल्लंघनाच्या 13 घटना तर ऑगस्टमध्ये 44 तर सप्टेंबरमध्ये 102 प्रकरणे घडली होती. त्यामुळे आता पाकिस्तानने पुन्हा एकदा खुरापाती चालू केल्या असून भारतीय सैन्य देखील त्यांना तोडीसतोड उत्तर देत आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like