पाकिस्तानी अभिनेत्रीचा फोटो व्हायरल ! लोक म्हणाले – ‘कियारा आडवाणीची COPY’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस माहिरा खान हिनं बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. भारतीय चाहत्यांच्या मनात तिनं आपलं स्थान तयार केलं आहे हेही तितकंच खरं आहे. माहिरा इंस्टावरून जगभरातील चाहत्यांसोबत संपर्कात असते. अलीकडेच माहिरानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती अचानक चर्चेत आली आहे.

माहिरानं इंस्टावरून शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, तिनं मोठी हॅट घातली आहे. तिनं तिचा चेहरा जवळपास पूर्णच हाईड केला आहे. फक्त माहिराचे लिप्स दिसत आहेत. खास बात अशी की, अनेक चाहत्यांना तिचा हा फोटो पाहून असं वाटलं की, काही प्रमाणात कियारा आडवाणीसारखी दिसत आहे. काही चाहत्यांनी तिच्या या फोटोवर तशी कमेंटही केली आहे. एकानं थेट म्हटलं की, कियारा आडवाणीकडून कॉपी केलेला लुक आहे हा. माहिराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अद्याप 1 लाख 96 हजार लोकांनी माहिराचा हा फोटो लाईक केला आहे.

इतरही असे अनेक युजर्स आहेत ज्यांनी माहिराचा हा लुक कियाराच्या लुकसोबत साम्य दर्शवतो असं म्हटलं आहे. माहिरानं फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, “त्या काळात जेव्हा अस्वस्थता जास्त वाढत आहे. लक्षात ठेवा आपण सारे यात सोबत आहोत. आशा करते की, लवकरच याच्याशी निपटण्यास मदत होईल.”