PAK क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला पाचवी मुलगी, सोशल मीडियावर युजर्स म्हणाले…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बाप झाला आहे. 14 फेब्रुवारीला आफ्रिदीने त्याला मुलगी झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. आफ्रिदीची ही पाचवी मुलगी आहे. अजवा, अंसा, अक्सा आणि असमारा या मुलींच्या पाठीवर आफ्रिदीला ही पाचवी मुलगी झाली.

आफ्रिदीने केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की ईश्वराचा आशीर्वाद आणि कृपा माझ्यावर आहे. माझ्या चार मुली आहेत आणि आता पाचवी झाली आहे. ही बातमी मला तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होत आहे.

आफ्रिदीने चाहत्यांना ही खुशखबर दिल्यानंतर चाहत्यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याला प्रश्न केला की आणखी किती मुलांना जन्म देणार, आम्ही आणखी पाच जणांची वाट पाहत आहोत.


एक महिला म्हणाली की चार मुलीपर्यंत ठिक होतं. लोकसंख्येचा विचार करायला हवा. फक्त मुलगा हवा म्हणून मुलीची क्रिकेट टीम तयार करण्याचा विचार आहे का ? असा सवाल उपस्थित केला. जर तुला आणखी मुलं हवीच असतील तर एखाद्याला दत्तक घेऊन त्याला चांगले आयुष्य देण्याचा सल्ला एका यूजरने आफ्रिदीला त्यांच्या पोस्टवर दिला.

You might also like