PAK तरुणीचा दावा ! माझे ‘अब्बू’ आहेत ट्रम्प, आईशी भांडायचे, सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी तरुणी असा दावा करत आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिचे वडील आहेत.

पाकिस्तानी तरुणी मीडियाशी बोलताना म्हणत आहे की, डोनाल्ड ट्रम्प तिचे खरे वडील आहेत आणि आता तिला आपल्या वडिलांना भेटायचे आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणी म्हणत आहे की, ‘मला प्रत्येकाला स्पष्ट करून दाखवायचे आहे की मी डोनाल्ड ट्रम्प यांचे खरे अपत्य आहे, मी एक मुस्लिम आहे आणि ब्रिटिशांसह आलेल्या ब्रिटीशांनी मला पहिले कि ही मुलगी इथे काय करत आहे. मला इस्लाम आवडतो, मला शांती आवडते. डोनाल्ड ट्रम्प नेहमी माझ्या आईला म्हणायचे की, तू बेफिकीर आहेस. तू माझ्या मुलीची काळजी घेऊ शकत नाहीस. जेव्हा माझ्या आई-वडिलांचे भांडण झाले, तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. आता मला माझ्या वडिलांना भेटायचे आहे.’

लोक सोशल मीडियावर या मुलीची चेष्टा करत आहेत आणि म्हणत आहेत की, हे सर्व फक्त पाकिस्तानमध्ये शक्य आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या नोव्हेंबरमध्ये होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यांनी तीन विवाह केले आहेत. पहिल्या दोन पत्नींपासून त्यांचा घटस्फोट झाला आहे.