अपमान सहन न झाल्याने ‘त्याने’ केली आत्महत्या, अपमान करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून पाथरी तालुक्यातील मसला खुर्द येथे एका गटाकडून संगनमताने मारहाण करण्यात आल्याने अपमान सहन न झाल्याने एकाने जीवनयात्रा संपवली ही घटना (18 एप्रिल ) रोजी घडली. मयत हा मसला खुर्द येथील असून हनुमान प्रल्हाद धरपडे असे त्याचे नाव आहे सदर प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे

मसला खुर्द येथील गोदावरी नदी पात्रातून वाळू काढण्याच्या कारणावरून भांडण झाल्याचे राग मनात ठेवून मारहाण केली हनुमान धरपडे याला झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने त्याने ढालेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला ठिबकाच्या नळीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात तुळशीराम रामकिशन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.सदाशिव बुवाजी शिनगारे, श्रीराम विठ्ठल शिनगारे, मच्छिंद्र रायभार करे, माधव शेंडगे, वचिष्ठ आसाराम कोळेकर, गणेश महादेव शेंडगे, बालू यादव या सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे

या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर बोधगिरे हे करीत आहेत.