NRC, CAA, NPR कायद्याविरुद्ध ग्रामपंचायतचे ‘ठराव’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीकडून एनआरसी, सीएए, एनपीआर विरुद्ध ठराव करण्यात आले आहेत.

सोनपेठ तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, एनआरसी, सीसीए, एनपीआर हे कायदे सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरणार आहेत.

तर मागच्या आठवड्यात पाथरी तालुक्यातील हादगाव ग्रामपंचायती कडून एनआरसी, एनपीआर, सीएए कायद्याविरोधात ठराव करण्यात आला आहे.

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे 18 मार्च रोजी ग्रामस्थांच्यावतीने ग्राम विकास अधिकारी एसबी घुंबरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनामध्ये एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याविरुद्ध ठराव घेण्यात यावा असे म्हटले आहे.

निवेदनावर अनंत कांबळे, कैलास पवार, अन्सार पठाण, गणेश रणेर, कारभारी अवचार, निसार पठाण, शेख रियाज, मंचक हरकळ, प्रदीप लहाडे, शेख आयुब, लक्षमण सोगे आदीसह इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.