Parliament Budget Session | नारायण राणेंना इंग्रजीत विचारला प्रश्न, दिलं भलतंच उत्तर, अडचणीत आणणारा खासदार भाजपाचाच, पुढे घडलं असं…

नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament Budget Session) सुरू असून राज्यसभेत महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्याच्या बाबतीत मोठा अडचणीचा प्रसंग घडला आहे. सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना एका खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला, आणि नारायण राणे यांची भंबेरी उडाली. प्रश्न एक आणि उत्तर भलतेच सुरू केल्याने सभागृहात कुजबूज सुरू झाली. मात्र, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी वेळीच हस्तक्षेप करून राणे यांना सावरून घेतले.(Parliament Budget Session)

विशेष म्हणजे राणेंना इंग्रजीत प्रश्न विचारणारे हे खासदार भाजपाचेच आहेत. भाजपा खासदार कार्तिकेय शर्मा (BJP MP Kartikeya Sharma) असे त्यांचे नाव आहे. शर्मा यांनी नारायण राणे यांना विचारले की, एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? मात्र, प्रश्न इंग्रजीत विचारल्याने राणे यांना काहीच कळले नाही.

एमएसएमईमध्ये निर्यात तशा पद्धतीने वाढवणार याबाबत राणे बोलू लागले. त्यानंतर काही खासदारांनी गोंधळ करायला सुरूवात केली. यामुळे राणेंची आणखी त्रेधा तिरपिट उडाली.

गोंधळलेले नारायण राणे हे एमएसएमई क्षेत्रात निर्यात वाढविण्यासाठी सरकारकडून मेक इन इंडिया योजनेच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आखलेले आहेत, असे सांगू लागल्याने राणे गडबडल्याचे उपस्थित खासदारांच्या लक्षात आले आणि गोंधळ सुरू झाला.

गोंधळ करत असलेल्या खासदारांना राणे हे… तुम्ही ऐका.. तुम्ही ऐकून घ्या, असे म्हणत होते. यावेळी, क्या… काय केलं…
असेही ते हळु आवाजात म्हणाले. कारखाने सुरू झाले नाहीत, तर कामगारांचे प्रश्न सुटतील का? असे तावातावाने राणे
बोलत राहिले. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने खासदारही आक्षेप घेत होते.

यावेळी राणेंच्या मदतीला राज्यसभेचे उपाध्यक्ष, पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह धावून गेले.
त्यांनी राणे यांना कार्तिकेय यांनी नेमका काय प्रश्न विचारला, हे हिंदीतून सांगितले.

यानंतर संबंधित खासदार महोदयांना बोलावून एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार
काय पावले उचलत आहे, हे तुम्ही त्यांना सांगा, असे निर्देश हरिवंश नारायण सिंह यांनी दिले…आणि नारायण राणे यांची
या अवघड प्रसंगातून सुटका झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक