पार्थ पवारांच्या प्रचारासाठी आजोबा, वडील, आई मैदानात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आजोबा, वडील यांना कमीपणा वाटेल असे पार्थपवार वागणार नाही असा विश्वास पार्थ पावार यांच्या मातोश्री सुनेत्रा पावार यांनी व्यक्त केला आहे. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आजोबा शरद पवार, वडील अजित पवार आणि मातोश्री सुनेत्रा पवार हे मैदानात उतरले आहेत. सुनेत्रा पवार यांनी दापोडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी नगरसेविका माई काटे, महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, आदी उपस्थित होते.

सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पार्थ शरद पवार अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू त्याला घरातून मिळालेलं आहे. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमी पणा येईल असं तो वागणार नाही असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करतील अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या अस देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या.

महिला, तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मोदी सरकारच्या काळात अनेक नवीन शब्द ऐकायला मिळाले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ ला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी होती,त्यामुळे पार्थ ला उमेदवारी देण्यात आल्याचंही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.