आईच्या खांद्यावरून घेतला जवानानं अखेरचा निरोप, रडत-रडत म्हणाली – ‘परत द्या माझा लाल’

बमियाल/पठानकोट/तारागड : वृत्तसंस्था – जगातील सर्वात उंच आणि दुर्गम युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये कर्तव्यावर असलेली लष्काराच्या ५ डोगरा युनिटचे जवान २२ वर्षीय अरूणजीत कुमार ग्लेशियरहून सुट्टीवर येत होते. चंदीगड एयरपोर्टवर येताच त्यांची प्रकृती खालावली. त्यांना लष्कराच्या चंडी मंदिर कमांड रूग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे रविवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तिरंग्यात लपेटलेला त्यांचा मृतदेह बमियाल सेक्टरमधील त्यांच्या फरवाल गावात आणण्यात आला. यावेळी अरूणजीत यांच्या आईने स्मशानघाटापर्यंत त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते.

अंत्यसस्कारासाठी मामूनहून लष्काराच्या ३/४ जी.आर. यूनिटचे जवान, मेजर दीपक सिंह, ५ डोगरा यूनिटचे अधिकारी कर्नल पीयूष सूद, सूभेदार नरेंद्र सिंह, आमदार जोगेंद्र पाल, शहीद सैनिक परिवार सुरक्षा परिषदेचे महासचिव कुंवर रविन्द्र सिंह विक्की, नायब तहसीलदार सतीश कुमार, सरपंच दलजीत सिंह, पी.पी.सी.सी. सचिव सुरेंद्र महाजन शिंदा, रविन्द्र शर्मा, सरपंच सुमित, नायब सुभेदार निर्मल कुमार थापा, सुभेदार शक्ति पठानिया, शहीद जवान जतिंद्र कुमारचे वडील राजेश कुमार, कॅप्टन स्वर्ण सिंह, कॅप्टन हरदीप सिंह, कॅप्टन बलवीर सिंह आदि उपस्थित होते.

आईचा फोटो घेवून गेला होता ग्लेशियर
५ महीन्यापूर्वी जवान अरुणजीतचे युनिट फैजाबादहून ग्लेशियरला जात असताना त्याने घरी फोन करून कुटुंबाला पठानकोटमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तसेच आईला येताना तिचा फोटो सोबत आणण्यास सांगितले होते. आईने फोटो कशासाठी विचारले असता, त्याने सांगितले की, आई ग्लेशियरमध्ये खुप धोका असतो. तेथे काम करणे खुप अवघड असते. एखादवेळी मी तेथून जीवंत येऊ शकणार नाही. जेवढे दिवस तेथे राहीन तुझा फोटो पाहून मला ताकद मिळेल.

अरूणजीतचे पार्थिव घरी आल्यानंतर त्याची आई बेशुद्ध पडली होती. माझं बाळ मला परत करा, असा आक्रोश ती करत होती. शहीद अरूणजीतच्या खांद्यावरच कुटुंबाची जबाबदार होती. त्याच्या जाण्याने आता हे कुटुंब एकाकी पडले आहे. त्याची आई लवकरच त्याचा विवाह करण्याच्या तयारीत होती. परंतु, तिची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/