Coronavirus : नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 पैकी चौघांना ‘कोरोना’ची ‘लागण’ !

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना बाधितांचा संख्या कमी होत नसून आरोग्य विभागाकडून यावर शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना वाढता आकडा राज्यासाठी चिंतेचा विषय ठरत असताना महाराष्ट्रातील शिर्डी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यालाच नाही तर देशाला देखील धक्का देणारी आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले होते आणि त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. तेच रुग्ण आता पॉझिटिव्ह आढळले आहेत.

संमनेरमध्ये नेपाळ येथून 14 जण परतले होते. या सर्वांना क्वारंटाइन करून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या 14 जणांच्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. परंतु, आज 14 दिवस उलटल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्यावेळी धक्कादायक रिपोर्ट समोर आला. ज्या 14 जणांची पुन्हा चाचणी करण्यात आली होती त्यापैकी 4 जणांच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून डॉक्टर देखील चक्रावून गेले आहेत.

राज्यात आतापर्यंत ज्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले, त्याच्यावर पूर्ण उपचार करून आणि संपूर्ण चाचण्याअंती रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच घरी सोडण्यात आले होते. मात्र, संगमनेरमध्ये निगेटिव्ह झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे 19 एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यातील चारही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. 14 दिवसांनी केलेल्या दोन्ही चाचण्याचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना नगरमधून डिस्चार्जही देण्यात आला होता.