Pavana Dam | दुर्दैवी ! पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pavana Dam | मावळ तालुक्यातील पवना धरण (Pavana Dam) परिसरात पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा (Tourists) धरणाच्या पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. आर्या दिपक जैन Arya Deepak Jain (वय – 13) आणि समिर कुलदिप सक्सेना Sameer Kuldeep Saxena (वय – 43 दोघे रा. प्रभादेवी, वरळी, मुंबई) असे मृत्यू झालेल्या दोन पर्यटकांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज (शुक्रवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास फांगणे गावच्या हद्दीत घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने त्यांच्या सोबत आलेल्या इतर पाच ते सहा जणांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात आले. तर दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे पाठवण्यात आले.

 

प्रभादेवी येथील काही पर्यटक पवना धरण (Pavana Dam) परिसरात पर्यटनासाठी आले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास सर्वजण धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले.
पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची नोंद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavala Rural Police Station) करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title : –  Pavana Dam | two tourists from mumbai drowned near pavana dam in maval taluka of pune pimpri chinchwad crime news

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा