11 वी प्रवेशाचा मार्ग मोकळा ! मराठा आरक्षणाशिवाय पार पडणार प्रवेश प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारच्या आदेशानुसार एसईबीसी आरक्षणाशिवाय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 26 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे. एसईबीसी वर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना वर्ग बदलण्याची संधी आहे. गुणवत्ता यादी ५ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. तर ९ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये अशी मागणी मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. आता रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच संदर्भातील जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे.

मंध्यन्तरी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया थांबवली होती . परंतु, ती अजून न रखडता सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका केली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया काही कालावधी थांबली होती.

You might also like