लोकसभा उमेदवारांचे ‘पवार कनेक्शन’ ; काय आहे नात्यागोत्यांचे राजकारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार नको म्हणत शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूकीला माघार घेतली. तरीही शरद पवार यांच्याशी नाते संबंध असणारे पाच उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी तीन उमेदवार हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत आहेत. तर दोन उमेदवार हे सेना-भाजपकडून लोकसभेची उमेदवारी करत आहेत.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणूकीसाठी बारामती मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी करत आहेत. तर त्यांच्या विरोधात निडणूक लढणाऱ्या कांचन कुल या देखील पवार कुटुंबाच्या जवळच्या नातलग आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या आत्या आहेत. सुनेत्रा पवार यांचे चुलत बंधू कुमारराजे निंबाळकर हे कांचन कुल यांचे वडील आहेत.

अजित पवार यांचे पुत्र आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. तर तिकडे उस्मानाबाद मतदारसंघातून पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह राष्ट्रवादीच्या तिकिटावरच लोकसभा निवडणूक लढत आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे पद्मसिंह पाटील हे सख्खे बंधू आहेत. तर उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे सुनेत्रा पवार यांच्या सख्या चुलत भावाचे म्हणजे पवनराजे निंबाळकरांचे पुत्र आहेत.

You might also like