शरद पवारांचा संताप पत्रकाराच्या वर्तनावर !

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चिडले होते. त्यावर राज्यभरातून मोठ्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. अनेक नेत्यांनी या प्रकरणी शरद पवार यांच्यावर टीकादेखील केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी कांग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पत्रकारांच्या स्वातंत्र्याला धक्का लागणे चूकच मात्र जर हेच पाप सत्ताधाऱ्यांनी केले तर ते पुण्यकर्म, अशी सध्या परिस्थिती आहे असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील वर्तनावर बोलताना ते म्हणाले कि, शरद पवार नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, मात्र त्यांनी पत्रकारांच्या विनंतीवरून पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मात्र यामध्ये एका पत्रकाराने चुकीचा प्रश्न विचारत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पत्रकाराने प्रश्नाचा धोशा सुरूच ठेवल्याने पवारांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.

या पत्रकाराने प्रश्न विचारला होता कि, तुमच्याकडे असलेले नेते आतापर्यंत पक्ष सोडून जात होते, मात्र आता तुमचे नातेवाईक देखील पक्ष सोडून जात आहेत, असा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला. त्यावर पवारांनी येथे नातेवाईकांचा काय संबंध आहे असे विचारले. त्यानंतर इतर पत्रकारांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा पवारांनी पत्रकार परिषद सुरु ठेवली.

त्यांनी केले तर पुण्यकर्म..
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या घटनेवर स्पष्टीकरण आणि बाजू मांडताना सांगितले कि, माध्यमांवर शरद पवार कसे संतापले याची क्लिप व्हायरल होत आहे. मात्र ते का चिडले याची कुणीही दखल घेत नाही. त्यामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्याला सत्ताधाऱ्यांकडून धक्का लागला तर ते पुण्यकर्म, मात्र आमच्याकडून झाले तर पाप, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

आरोग्यविषयक वृत्त