प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, फक्‍त नवरात्रीच्या पुर्वी ‘या’ गोष्टींवर लक्ष ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 29 सप्टेंबर नवरात्रीला सुरुवात झाल्यानंतर देवीचे आगमन होईल. देवीच्या आगमनानंतर तयारीसाठी वास्तू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक देवी देवतांची एक दिक्षा असते. देवी देवतांनुसार ज्या दिशा निश्चित असतील, त्यांची पूजा त्यात प्रकारे झाली पाहिजे.

पौराणिक मान्यतानुसार देवीचे क्षेत्र दक्षिण दिशेला मानले जाते. हे अत्यंत महत्वाचे आहे की पूजा करताना आपले मुख (चेहरा) पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. पूर्व दिशेला मुख करुन देवीचे ध्यान, पूजा केल्याने आपली चेतना जागृत होते तर दक्षिणेला मुख करुन पूजन केल्यास मानसिक शांति मिळेल आणि देवीशी आपण थेट जोडले जातो.

वास्तू अनुसार देवीची जिथे स्थापना केली जाते तेथे मंद पिवळा, हिरवा आणि गुलाबी रंग असला पाहिजे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते. घराच्या उत्तर पूर्व दिशेला लाकडाचे पिरामिड आहे. यामुळे पूजा करताना मन लागेल. मात्र हे लक्षात ठेवा की पिरामिड आतून भरीव नसेल. पूजा सुरु करण्याआधी स्वस्तिक नक्की तयार करा. वास्तूशास्त्रानुसार मंदिरात आणि घरात शुभ काम करण्याआधी हळद किंवा कुंकवाने स्वास्तिक प्रतिक चिन्ह बनवण्याची परंपरा आहे.

Visit – policenama.com 

You might also like