24 डिसेंबरपर्यंत तुरूंगात पाठवलं पायल रोहतगीला, पं. नेहरूंवर केलं होतं ‘आक्षेपार्ह’ वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्याचे वडील मोतीलाल नेहरु यांच्या विरोधात वादग्रस्त व्हिडिओ बनवणे आणि तो शेअर करण्याच्या प्रकरणात अभिनेत्री पायल रोहतगीला न्यायलयाने 24 डिसेंबरपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पायलला या प्रकरणी नुकतेच बूंदी पोलिसांनी अहमदाबादमधून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर पायल आणि तिचा पार्टनर संग्राम सिंह यांनी ट्विटरवर पीएम मोदी आणि गृहमंत्रालयाकडे मदत मागितली होती. त्यांना या प्रकरणी मदत मिळाली नाही. त्यांच्या जामीन याचिकेला देखील न्यायालयाने रद्दबातल ठरवले. ज्यानंतर आता तिला 24 डिसेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल.

पायलच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली कारण तिने स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. तिने ट्विट केले की मला मोतीलाल नेहरूंवर तयार करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती मी गुगलवरुन मिळवली होती. अभिव्यक्ती स्वतंत्र फक्त नावाला आहे का ?

काय आहे पायलच्या विरोधात तक्रार
यानंतर पार्टनर संग्रामने पीएम मोदींना टँग करत ट्विट केली होते. त्यात लिहिले होते की काँग्रेस सत्ताधारी राजस्थानात हे आहे का अभिव्यक्ती स्वतंत्र? सर कृपया यात लक्ष घाला.

पायल रोहतगीच्या विरोधात समाजिक कार्यकर्ता आणि यूथ काँग्रेसचे चर्मेश शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार चर्मेश शर्मा यांचा आरोप आहे की या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीच्या मृत्यूबाबात अशी बाब मांडण्यात आली आहे की ज्याचा भारत आणि परदेश संबंधांवर प्रभाव होईल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/