Paytmचे संस्थापक शेखर यांना 20 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी झाली होती ‘या’ महिलेला अटक, आता पुन्हा कंपनीत रूजू

पोलीसनामा ऑनलाइनपेटीएमच्या माजी कार्यकारी सोनिया धवन यांनी पुन्हा एकदा पेटीएम ज्वाइन केले आहे. त्या कंपनीच्या गेमपाइंट एंटरटेनमेंटसाठी काम करत होत्या. सोनिया यांच्यावर कंपनीचा डाटा चोरीचा आणि संस्थापक विजय शर्मा यांच्याकडून 20 कोटी रुपये खंंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना 5 महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला. गेमपाइंट पेटीएमची मुख्य कंपनी वन 97 कम्युनिकेशन आणि एजीटेक डोल्डिंग्स लिमिटेडचे जॉइंट वेंचर आहे.
 
विजय यांच्या भावाने केली होती सोनिया यांची तक्रार –
सोनिया धवन यांना या महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 22 ऑक्टोबरला पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शर्मा यांचे भाऊ अजय शर्मा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सोनिया यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी पेटीएमच्या इतर कर्मचाऱ्यांसह डाटा चोरला त्यानंतर अजय शर्मा यांना 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. 
 
सोनिया यांच्याकडे होते कंपनीचे 1400 शेअर –
सोनिया यांच्याकडे नोव्हेंबर 2017 साली कंपनीचे 1400 शेअर होते. त्याची सध्याची किंमत 3.2 कोटी रुपये आहे. त्या पेटीएममधून वर्षाला 85 लाख रुपये कमावत होत्या.

दर महिन्याला होतोय 330 कोटी रुपयांचा तोटा –

पेटीएमला रोज 11 कोटी रुपयांच्या तोटा होत आहे. यात मागील वित्त वर्षात 165 टक्के वाढ झाली. 1,490 कोटी रुपयांनी वाढून हा तोटा 3,959.6 कोटी रुपयांवर पोहचला.  2018-19 कंपनीचे उत्पन्न 3,319 कोटी रुपये होते, तर 2017-18 या वर्षात 3,229 कोटी रुपये येवढे कंपनीचे उत्पन्न होते. 
 
सोनिया यांचे काय आहे म्हणणे – 
 सोनिया धवन म्हणाल्या की माझ्या विरोधात हे शडयंत्र होते. जे विजय, शेखर यांनी रचले होते. तर पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार मागील दोन महिन्यापासून कंपनीच्या संस्थापकांना बँकमेल करत आहे. यांच्या नाराजीचे कारण हे होते की, कंपनीने त्यांचे 4 कोटी रुपयांचे लोन देण्यास नकार दिला होता. परंतू याशिवाय अजून अनेक बाबी बाकी आहेत ज्या अजून पुढे येणे बाकी आहे. 
You might also like