अमेठीच्या लोकांनी स्मृती इराणींच्या विरुद्ध लावलं ‘पोस्टर’, लिहिलं – ‘खोटारडे पंतप्रधान, खोटरड्या खासदार’

अमेठी : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीच्या लोकांना दिलेली आश्वासने न पाळल्याने केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकांना रेशनवर स्वस्त दराने साखर देण्याच्या आश्वासनाचे हे प्रकरण आहे.

काँग्रेस आमदाराने लिहिले पत्र
काँग्रेस आमदार दीपक सिंह यांनी पत्र लिहून, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिलेल्या 13 रूपए किलो साखरेच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. दीपक सिंह यांनी लिहिले आहे की, अमेठीच्या लाखो गरीबांचा होळीचा गोडवा हिरावून घेऊ नका, जो त्यांना नेहमी मिळत होता.

स्मृती इराणी यांनी जनतेला दिले होते वचन
तर दुसरीकडे आज रातोरात अमेठीमध्ये नाक्या नाक्यावर पोस्टर लागले आहेत. पोस्टरवर लिहिले आहे, खोटारडा पंतप्रधान, खोटारडी खासदार. अमेठी 2019 लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, निवडणूक जिंकल्यास 13 रूपये किलो दराने साखर देऊ. परंतु, येथे साखर 13 रूपये किलो दराने मिळणे दूरच, येथील गरीबांना साखर मिळणेच बंद झाले आहे. अशी खोटारडी खासदार अमेठीच्या जनतेला नको.