2 महिने उलटूनही पुरंदरचे पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) : पुरंदर तालुक्यामध्ये सप्टेंबरमध्ये कऱ्हा नदीला आलेल्या महापुरामुळे असंख्य गावात शेतकऱ्यांच्या शेतजमीनींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकरी दोन महिन्यांपासून सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहे. आता सरकारला आपला विसर पडला आहे की काय ? असा प्रश्न हे शेतकरी सध्या उपस्थित करीत आहेत.

नारायणपूर, भिवडी, कोडीत, सासवड, कुंभारवळण, खळद, खानवडी, एखतपुर – मुंजवडी, वाळुज, निळूज, बेलसर, कोथळे व अन्य कहा नदी परिसरातील गावांमध्ये शेतजमिनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्यावतीने फक्त पंचनामे झाले पण प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांना निधी देण्याकडे सोईस्कररित्या काणाडोळा झाला.आता मात्र ,या घटनेला जवळपास दोन महिने झाले तर निवडणुकापूर्ण होऊनही जवळपास एक महिना होऊन गेला आहे , तरीही शेतकऱ्यांच्या वाट्याला अद्यापपर्यंत एक रुपयाही आला नाही.

पुरंदर तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सरकारला सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचे सर्व अहवाल पाठविले आहेत. यामध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारतर्फे मंजूर झाली आहे. दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. सप्टेंबर महिन्यातील नुकसानीबाबत अद्यापपर्यंत कोणतीही मदत मंजूर झाली नाही.

Visit : Policenama.com