पीरियड्सच्या भयानक वेदना मिनीटांमध्ये करा दूर, ‘या’ 4 गोष्टींचा करा वापर, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – पीरियड्स दरम्यान बर्‍याच महिला तीव्र वेदना आणि चिडचिडेपणाची तक्रार करतात. या वेदनांमुळे कोणत्याही कामात मन लागत नाही आणि संपूर्ण दिनक्रम बिघडतो. काही उपायांनी या वेदनांपासून सुटका मिळवली जाऊ शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

हलका व्यायाम करा
बर्‍याच लोकांना असे वाटते की पीरियड्स आल्यावर केवळ झोपल्याने आराम मिळतो, परंतु हे खरे नाही. तज्ञ म्हणतात की, पीरियड्स दरम्यान हलका व्यायाम केला पाहिजे. यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन तयार होते, जे नैसर्गिक पद्धतीने वेदना कमी करून मूड चांगला करतात. यावेळी योगा करणे चांगले असते.

हिट थेरपी घ्या
पिरियड्सच्या वेदनांमध्ये हीट थेरपी खूप प्रभावी असते. वेदना होत असतील, तर पाठीच्या खालच्या भागावर किंवा ओटीपोटावर हिट पॅड किंवा गरम पाण्याची पिशवी ठेवा, यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. तज्ञ म्हणतात की, हिट ट्रीटमेंट पेनकिलरच्या गोळी प्रमाणे काम करते.

भरपूर पाणी प्या
पीरियड्स दरम्यान भरपूर पाणी प्या. या दरम्यान शरीरात पाण्याअभावी पोटात जास्त वेदना होतात. याशिवाय काकडी आणि टरबूजसारखे पाणी असलेली रसदार फळे आणि भाज्याही खायला पाहिजेत. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

मसाज थेरेपी
आवश्यक तेलाने पोटाच्या चारी बाजूने हळूवारपणे मालिश करा. यामुळे पिरियड्सच्या वेदना कमी होतात. पीरियड्सच्या वेदनांमध्ये आवश्यक तेलाच्या वापराबद्दल २०१२ मध्ये एक अभ्यास देखील केला गेला आहे. त्यात असे म्हटले गेले आहे की, आवश्यक तेलाने मालिश करणार्‍या महिलांना पीरियड्स दरम्यान वेदना झाल्या नाही.