Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी झाले स्वस्त, जाणून घ्या 16 सप्टेंबरचे तुमच्या शहरातील रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर आकाशाला जाऊन पोहचले आहेत, परंतु आता हळुहळु किमती कमी होत आहेत. बुधवारी (16 सप्टेंबर) दिल्लीत पेट्रोल 81.55 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे, तर मुंबईत 88.21 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर दिल्लीत डिझेल 72.56 रुपये प्रति लीटरने विकले जात असून मुंबईत डिझेल 79.05 रुपयांनी विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई           88.21 – 79.05
पुणे            88.61 – 78.24
ठाणे           88.27 – 79.11
अहमदनगर 88.75 – 78.37
औरंगाबाद  88.64 – 78.27
धुळे           88.60 – 78.25
कोल्हापूर  88.50 – 78.17
नाशिक     88.36 – 78.01
रायगड      89.13 – 78.72

पेट्रोल डिझेलच्या किंमती यामुळे झाल्या कमी
सौदी अरबने संपूर्ण जगात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या वाढत असताना ऑक्टोबरसाठी कच्च्या तेलाची विक्री किंमत कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमती 40 डॉलरने खाली आल्या. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, याचा थेट फायदा भारतासारख्या अर्थव्यवस्थेला मिळेल. कच्च्या तेलावरील आयातीचा खर्च कमी होईल, आणि स्थानिक बाजारात पेट्रोल डिझेलमध्ये मोठी घसरण होऊ शकते.

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता