खुशखबर ! ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात आज पुन्हा मोठी ‘घसरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण सुरू आहे. विदेशी बाजारातून कच्च्या तेलाची सातत्याने खरेदी होत असल्यामुळे देशातील तेल विपणन कंपन्या (HPCL, BPCL, IOC) देखील आता आपल्या ग्राहकांना लाभ देत आहेत. त्यामुळेच आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या दर हे ४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. शुक्रवारी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत २१ पैशांनी घसरून ७२.६८ रुपये झाली आहे. या काळात डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी घट दिसून आली आहे. एक लिटर डिझेलची किंमत आता ६५.६८ रुपये झाली आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे असे कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे सर्वसामान्यांसह देशाच्या आर्थिक वाढीस देखील मदत मिळणार आहे.

असे तपासा आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर

जर आपल्याला घरी बसून पेट्रोल-डिझेलच्या किमतीची माहिती हवी असेल तर आपल्याला आपल्या फोनवरून फक्त एक मॅसेज करावा लागणार आहे. विशेष म्हणजे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर हे सकाळी ६ वाजता जारी केले जातात.

नवीन दर जाणून घेण्यासाठी आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलर चा कोड लिहून ९२२४९९२२४९ या नंबरवर पाठवावा लागेल. उदाहरणार्थ जर आपल्याला दिल्लीमधील दर जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला RSP 102072 लिहून ९२२४९९२२४९ वर पाठवावे लागेल.