Petrol-Diesel Price : डिझेलच्या दराची वर्षातील ‘उच्चांकी’, पेट्रोलमध्येही ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वसामान्यांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने डिझेलच्या किमतीने या वर्षातील सर्वोच्च दर गाठला आहे. दिल्लीमध्ये डिझेलचा दर 67.78 रुपये प्रती लिटर इतका झाला आहे. तर पेट्रोलचा प्रति लिटर दर 75 रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑइलने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये अनुक्रमे 16 पैसे आणि 18 पैसे अशी दरवाढ पहायला मिळाली.

चार महानगरामध्ये पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू
इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार रविवारी देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर पहायला मिळाले ते पुढीलप्रमाणे

दिल्ली
पेट्रोल दर – 75.04 रुपये
डिझेल दर – 67.78 रुपये

कोलकत्ता
पेट्रोल दर – 77.70 रुपये
डिझेल दर – 70.20 रुपये

मुंबई
पेट्रोल दर – 80.69 रुपये
डिझेल दर – 71.12 रुपये

चैन्नई
पेट्रोल दर – 78.02 रुपये
डिझेल दर – 71.67 रुपये

रोज सकाळी 6 वाजता बदलतात किमती
पेट्रोल डिझेलचे दर रोज कमी जास्त होत राहतात. मात्र याचे नावे दर हे सकाळी सहा वाजता लागू होतात आणि या किमतींमध्ये एक्सइझ ड्युटी, डीलर कमिशन अशा प्रकारच्या सर्व गोष्टी जोडल्यानंतर किंमत दुप्पट वाढतात.

SMS च्या माध्यमातून जाणून घ्या तुमच्या शहराचे दर
तुम्हाला नवीन दरवाढ माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही 92249 92249 असा मेसेज पाठवून पेट्रोल डिझेलचे नवीन दर माहिती करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 यावर पाठवावा लागेल.

म्हणजेच समजा तुम्ही दिल्लीमध्ये असला तर दर माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला RSP 102072 लिहून 92249 92249 वर पाठवावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/