Photos : ‘या’ साऊथ इंडियन अभिनेत्रीच्या ‘बोल्ड’ सीन्सचं प्रकरण गेलं होतं कोर्टात, आलं होतं अजामीनपात्र वॉरंट

पोलिसनामा ऑनलाइन –साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस रीमा सेन आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. 29 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या रीमानं मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सध्य रीमा सिनेमात खूप कमी दिसते. आज आपण तिचा एक खास किस्सा जाणून घेणार आहोत.

2011 साली आलेल्या इलावारसी या तमिळ सिनेमात रीमानं अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. अनेक वर्ष तिच्या या सीन्सची चर्चा झाली. इतकंच नाही तर तिनं केलेल्या बोल्ड फोटोशुटसाठी तिला मदुराई कोर्टीनं अजामीनपात्र वॉरंटही पाठवलं होतं.

https://www.instagram.com/p/B_Rc2CagjD1/

रीमाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं 9 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या बिजनेसमन शिव करनसोबत लग्न केलं. लग्नानंतर तिनं सिनेमात काम करणं जवळपास सोडून दिलं.

रीमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रीमानं मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीला तिनं जाहिरातीतही काम केलं. यानंतर तिनं तेलगू सिनेमात काम केलं. तिचा पहिला सिनेमा चित्रम होता जो हिट झाला होता. साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. हम हो गए आपके हा तिचा डेब्यू सिनेमा होता. यात ती फरदीन खानसोबत दिसली होती. पंरतु हा सिनेमा खास काही चालला नाही, फ्लॉप झाला. रीमानं अनेक कॉमेडी सिनेमात काम केलं आहे. यात चल चला चल, मालामाल वीकली आणि जाल द ट्रेप असे काही सिनेमे आहेत. लग्नानंतर सिनेमात काम करणं सोडणाऱ्या रीमाचा गँग्स ऑफ वासेपूर हा सिनेमा शेवटचा सिनेमा होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1257906862265163778?s=20

https://twitter.com/30Kumaar/status/1257906970654277634?s=20