PIB Fact Check | मोदी सरकार नव्या योजनेंतर्गत नागरीकांना देणार 4000 रुपये? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PIB Fact Check | समाज माध्यमांवर अनेक वेगवेगळे मेसेज अधिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मात्र, सर्वच मेसेज हे अगदी (PIB Fact Check) बरोबरच असते असे काही नाही. पण सरकारविषयक योजनेचा असा काही मेसेज सोशल मिडियावर फिरत असल्याचं लोकांनाही खरं वाटतं. मात्र, त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. या पद्धतीचा मेसेज एक व्हायरल होत आहे. केंद्र सरकारने (Central Government) प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेच्या नावाने एक योजना सुरू केली. या योजनेत नोंदणी केल्यावर सर्व नागरीकांना 4 हजार रुपयांचे सहाय्य केले जाणार आहे. याबाबत माहितीचा मेसेज सर्वत्र फिरताना दिसत आहे. मात्र, हा मेसेज बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत लोकांना सावधान केलं आहे. मोदी सरकारच्या नावे अशाप्रकारे बनावट मेसेज तयार करुन नागरीकांची फसवणूक केली जात आहे. सरकारने अशी कोणातीही योजना आणली नसून अशा प्रकारची चुकीची माहिती देणारी वेबसाईट पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे. तसेच तुम्ही काळजी घ्या असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

 

अशा पद्धतीचा मेसेज आल्यास तुम्ही फसु नका. केंद्र सरकार या नावाची कोणतीही योजना चालवत नाही. त्यामुळे सरकारच्या नावाने ही फसवणूक सुरू आहे. लोकांना या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे तुम्हीही त्यापासून दूर राहिले पाहिजे आणि तुमची वैयक्तिक माहिती, विशेषत: बँक खात्याचा तपशील, अशा खोटे वेबसाईटवर कधीही शेअर करू नका. कोरोनाच्या महामारीत फसवणुकीच्या घटना अधिक वाढत आहेत. PIB फॅक्ट चेकने ट्विटर हँडलच्या माध्यमातुन या बनावट वेबसाईटचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे.

PIB Fact Check –
सरकार संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता.
कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा
फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता.
त्याचप्रमाणे [email protected] या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.

 

Web Title :- PIB Fact Check | fact check fake news fake website government giving four thousand rupees under new scheme marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! बारामतीमध्ये सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करुन बळी देण्याचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 93 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Koregaon Bhima Violence Case | IPS अधिकारी परामबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे आदेश